इनग्रोन टोनेल (Ingrown Toenail) म्हणजे पायाचे नख आतल्या बाजूने वाढणे. ही समस्या अनेकजणांना होते. यामध्ये पायाचे अंगठ्याचे नख असाधारण पद्धतीने वाढू लागते. याने क्युटिकल्स कट होतात.जर पायाचे नख आतल्या बाजूने वाढले तर त्यातून बॅक्टेरिया प्रवेश करू शकतात. त्यामुळे दुर्गंधी येते आणि त्यातून द्रव वाहू शकते.तसेच त्या ठिकाणी लालसरपणा आणि सूज यांसारखी लक्षणे दिसू लागतात. त्वचा मऊ होते. आणि या ठिकाणी दाबल्यावर वेदना सुरू होतात. यावर वेळीच उपचार केला नाहीतर त्याचा खूप त्रास होऊ शकतो.
इनग्रोन टोनेलची लक्षणे खालीलप्रमाणे आहेत ( Ingrown Toenail Symptoms in Marathi):-
- नखालगतची त्वचा सुजते.
- बोट दाबले तर दुखते.
- चालताना वेदना जाणवतात.
- नखाभोवती पू किंवा पस होतो.
- रक्तस्त्राव ही होऊ शकतो.
इनग्रोन टोनेलची कारणे (Ingrown Toenail Causes in Marathi):-
- चुकीच्या पद्धतीने नखे चावणे
- घट्ट शूज किंवा मोजे घालणे
- जास्त घाम येणे.
- पायाची अस्वच्छता
- पायावर जखम झाल्यास
- नखे संक्रमण
- आनुवंशिकता
इनग्रोन टोनेलवर उपचार ( Ingrown Toenail Treatment in Marathi):-
पायांची अस्वच्छता हे प्रमुख कारण आहे. म्हणून घरगुती उपाय केले जातात. पण त्याने आराम न मिळाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
डॉक्टर तपासणीतून इनग्रोन टोनेल(Ingrown Toenail)आहे की नाही याचे निदान करू शकतात. नखं त्वचेमध्ये किती वाढले हे पाहण्यासाठी एक्स-रे आवश्यक असू शकतो.
तुमच्या पायाचे नख किती गंभीर आहे हे पाहून गरज असल्यास शस्त्रक्रियेचा सल्ला देतात.
डॉक्टर शस्त्रक्रिया करून नखं, नखांच्या आजूबाजूची त्वचा आणि आसपासचे मऊ टिश्यू काढून टाकतात.
जर रुग्णाला मधुमेह असेल तर या जखमा भरणे अवघड जाते. जर मधुमेहाचे प्रमाण जास्त किंवा तो नियंत्रित नसेल तर अवश्य तज्ञ डॉक्टरांना भेट घेऊन सल्ला घ्यावा.
शस्त्रक्रियेनंतर बहुतेक लोकांच्या वेदना कमी होतात. ही शस्त्रक्रिया खूप गंभीर नसून एकच दिवशी करून रुग्णाला घरी सोडण्यात येते. दुसऱ्या दिवशी ते त्यांचे नियमित दिनचर्या पुन्हा सुरूही करू शकतात.
पण जर उपचार करण्या निष्काळजी राहिलात तर तुमच्या संपूर्ण पायाच्या बोटाला संसर्ग होऊ शकतो. आणि त्यामुळे गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते.
डॉ. चेतन ओसवाल हे पाय आणि घोट्याचे(Foot & Ankle) तज्ञ सर्जन आहेत. त्यांनी युनायटेड किंग्डमहून याचे खास प्रशिक्षण घेतले आहे. पुण्यातील अत्यंत प्रख्यात बी.जे. मेडिकल कॉलेजमधून त्यांनी एमबीबीएस पूर्ण केली. ते गेल्या 12 वर्षांपासून ऑर्थोपेडिक्सचा सराव करत आहेत आणि आता पुणे येथे समर्पित फूट आणि घोट्याचे ऑर्थोपेडिक सर्जन( Foot & Ankle Orthopedic Sugeon) म्हणून काम करत आहेत. पाय आणि घोट्याशी संबंधित असलेल्या सर्व समस्यांसाठी त्यांनी प्रसिद्ध खेळाडूंवरही यशस्वीरित्या शस्त्रक्रिया केल्या आहेत.डॉ. चेतन ओसवाल त्यांच्या रूग्णांवर सर्व वैद्यकीय ज्ञान आणि कौशल्याने उपचार करण्याची खात्री देतात.