टाच दुखीने (Heel Pain) हैराण आहात का?; आधी योग्य कारण ओळखा मगच उपाय करा

Heel Pain specialist in Pune

टाचदुखी( Heel Pain) म्हणजे अगदीच किरकोळ दुखणं मानलं जातं. त्यामुळे याकडे सर्वात दुर्लक्ष केले जाते.  पण ही किरकोळ वाटणारी गोष्ट पुढे जाऊन त्रासाचे आणि समस्येचे कारण ठरू शकते. कधीकधी घरगुती उपाय करून हा त्रास वाढण्याचीच शक्यता असते.  म्हणून थोड्याशा प्रमाणात असलेल्या या टाचदुखीकडे( Heel Pain) वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.

कधी कधी अचानक जास्त चालल्याने किंवा उभे राहिल्याने या उतीमध्ये सूज येते. चालताना, उभे राहताना त्रास होतो. सूज कमी झाली की वेदना कमी होतात. पण, जर  सतत उभे राहिल्याने  हा त्रास वारंवार उद्भवत असेल तर डॉक्टरांना दाखवणे गरजेचे असते.

टाचदुखीची कारणे आणि उपचार (Heel Pain Causes and Treatment in Marathi):-

  1. खूप जास्त काळापर्यंत उंच टाचेच्या चपला किंवा बुट घातल्याने अनेक स्त्रियांना टाचदुखीचा ( Heel Pain) त्रास होतो. यामुळे टाचेची झीज होणे, पोटरीच्या स्नायूंवर ताण पडणे आणि प्लांटर फॅसिया  खूप जास्त ताणला जातो. याचा  एकत्रित परिणाम म्हणजे टाच दुखायला लागते. म्हणून उंच टाचेचे चपला आणि बूट नियमित आणि जास्त वेळेपर्यंत वापरणे टाळावे.
  2. सतत उभे राहिल्याने टाचेखालचं फॅट पॅड झिजून त्या ठिकाणी हील spurs तयार होतात. त्यासाठी cushions/heel support दिला जातो. याचा परिणाम म्हणजे टाचदुखी ( Heel Pain) कमी होते.
  3. खेळाडू किंवा एथलेट्स या लोकांना देखील टाचदुखीचा त्रास उद्भवू शकतो.  कारण पळताना त्यांच्या तळव्यावर ताण येतो. वयाच्या चाळीस ते साठीच्या दरम्यान  हा त्रास होऊ शकतो. गरज लागल्यास आजाराचे निदान करण्यासाठी डॉक्टर  एक्सरे किंवा एमआरआय करण्याचा सल्ला देतात.
  4. पोटरीचे स्नायू खूप कडक असल्यामुळे किंवा चुकीच्या पद्धतीने व्यायाम केल्याने सुद्धा त्रास उद्भवतो अश्या वेळी muscle stretching चे व्यायाम डॉक्टरांच्या सल्ल्याने करावेत.त्यानेही आराम मिळतो.
  5. ज्यांचे तळवे सपाट असतात आणि तळव्याचा आर्च (कमान) कमी असतो, अश्या लोकांना टाचदुखीचा त्रास त्रास होऊ शकतो.  यासाठी चपला-बुटांमध्ये आतून आधार लावावा लागतो.
  6. लठ्ठ असणाऱ्या व्यक्तींना हा त्रास जाणवतो.बहुतांश वेळा वैद्यकीय उपचार आणि योग्य व्यायाम केल्याने हा आजार आटोक्यात येऊ शकतो. वेदना किंवा सूज असते तेंव्हा आराम करणे, वेदनेच्या ठिकाणी बर्फ लावणे असे उपाय केल्याने तात्पुरत्या काळासाठी ही वेदना कमी होते. परंतु हा त्रास जास्त काळ होत असल्यास डॉक्टरांना जरूर भेटावे.

 

डॉ. चेतन ओसवाल हे  पाय आणि घोट्याचे ( Foot and Ankle Surgeon) तज्ञ सर्जन आहेत. त्यांनी युनायटेड किंग्डमहून याचे खास प्रशिक्षण घेतले आहे. पुण्यातील अत्यंत प्रख्यात बी.जे. मेडिकल कॉलेजमधून त्यांनी एमबीबीएस पूर्ण केली आहे. ते गेल्या 12 वर्षांपासून ऑर्थोपेडिक्सचा ( Orthopedics) सराव करत आहेत आणि आता पुणे येथे समर्पित फूट आणि घोट्याचे ( Foot and Ankle Orthopedics Surgeon)ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून काम करत आहेत. पाय आणि घोट्याशी संबंधित असलेल्या सर्व समस्यांसाठी त्यांनी प्रसिद्ध खेळाडूंवरही यशस्वीरित्या शस्त्रक्रिया केल्या आहेत.डॉ. चेतन ओसवाल त्यांच्या रूग्णांवर सर्व वैद्यकीय ज्ञान आणि कौशल्याने उपचार करण्याची खात्री देतात.