डायबिटिक फूट अल्सर ( Diabetic Foot Ulcer Treatment in Marathi)

Diabetic Foot Ulcer

जगभरात आणि विशेषतः भारतात मधुमेह (Diabetes) रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेह घरोघरी आहे. मधुमेहाचा परिणाम शरीरावर फार खोलवर होतो. मेंदू,डोळे, मुत्रपिंड या अवयवांसह पायांवरही मधुमेहाचा विपरित परिणाम होतो. पायाला जो त्रास होतो त्या आजाराला डायबिटिक फूट अल्सर (Diabetic Foot Ulcer) असे म्हणतात.

डायबिटिक फूट अल्सर मध्ये काय होते ?  ( Diabetic Foot Ulcers Symptoms in Marathi)

डायबिटिक फूट अल्सर (Diabetic Foot Ulcer) म्हणजे जेव्हा रुग्णाच्या पायाला जखम होते ती चिघळत जाते. त्या जखमेच्या संवेदना जाणवत नाहीत. किंबहुना जखम झाली तरी कळत नाही. त्यामुळे अल्सर होऊन त्यात पाणी होते आणि त्रास सुरू होतो. पायांना अल्सर(Ulcer) झाल्यामुळे त्वचेच्या पेशी तुटतात आणि त्याखालील त्वचेचा थर दिसू लागतो. सामान्यतः अंगठा आणि तळव्यावर हा होतो. वेळीच उपचार न केल्यास पायांचा आकार बदलतो. सूज येते. हे वाढत गेल्यास पाय कापायची वेळ येते.

डायबिटिक फूट अल्सरची कारणे ( Diabetic Foot Ulcer Causes in Marathi)

याचे मुख्य कारण दीर्घकालापासून असलेला आणि अनियंत्रित मधुमेह हे होय. त्यासोबतच उच्चरक्तदाब (High Blood Pressure) आणि धुम्रपानाचे (Smoking) व्यसन असेल तर त्याचा धोका अधिक वाढतो. साधारण चप्पल घालताना , चालताना या जखमा होतात पण पायाच्या संवेदना गेल्यामुळे लक्षात येत नाही. वृद्ध रुग्णांना हा धोका जास्त संभवतो. पायांच्या त्वचेचा रंग बदलत असेल तर डॉक्टरांचा त्वरित सल्ला घेणं गरजेचं असतं. याशिवाय लठ्ठपणा आणि व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर डायबिटिक फूट अल्सर होण्याचा धोका वाढतो.

डायबिटिक फूट अल्सर उपचार (Diabetic Foot Ulcer Treatment in Marathi)

रुग्णाच्या लक्षणांना बघून औषधे दिली जातात. चालताना काही त्रास होतो का हे तपासले जाते. कोणतीही जखम असेल तर रक्तवाहिन्यांच्या अडथळ्यामुळे आहे का, यासाठी तपासणी केली जाते. जर रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा असेल तर त्यासाठी अ‍ॅन्जिओप्लास्टी व स्टेंटिंग (Angioplasty and stenting) अथवा बायपासद्वारे रक्तपुरवठा सुरळीत करण्यासाठी व्हॅस्कुलर सर्जन शस्त्रक्रिया (Vascular Surgery) करतात. या प्रक्रियेद्वारे पाय कापण्यापासून वाचवता येऊ शकतो.

प्रतिबंधात्मक उपाय ( Diabetic Foot Ulcer Preventive Measures in Marathi)

मधुमेह असल्यास डायबेटिक फुटचे (Diabetic foot) धोके असतात. म्हणून पायांची विशेष काळजी घेणे. नियमित पायांची तपासणी करणे आणि कोणत्याही जखमेवर दुर्लक्ष न करणे. बोटांची नखे नियमित कापणे. घरात असताना देखील चपला वापरणे. साखर नियंत्रित ठेवण्यासाठी आहार व व्यायाम नियमित करणे. विटामिन D ची कमतरता भासू नये म्हणून सकाळी उन्हात बसणे. बाहेर जाताना आरामदायी बुटांचा वापर करावा. सगळ्यात महत्वाचे नियमित डॉक्टरांची भेट घेणे आणि तपासणे.

डॉ. चेतन ओसवाल  – Consultant Foot & Ankle Specialist (पाय आणि घोट्याचे तज्ज्ञ सर्जन ) (MBBS, MS (Orthopedic) ), हे पुण्यातील Best फूट अँड ऍकल स्पेशालिस्टकी एक आहेत (Foot and ankle specialist in Pune). Dr. Chetan Oswal is an Orthopedic surgeon with exclusive expertise in the foot and ankle area. He has had his advanced surgical fellowship from United kingdom. Complicated foot and ankle surgery are his forte. Dr. Chetan Oswal with his specialized training in foot and ankle reconstruction offers minimally invasive keyhole surgery for foot and ankle problems which enables patients to recover quickly & resume work/duties/sports at the earliest. डॉ. चेतन ओसवाल त्यांच्या रूग्णांवर सर्व वैद्यकीय ज्ञान आणि कौशल्याने उपचार करण्याची खात्री देतात.